नागपूर : विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुती तर्फे भाजपचे राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यापदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. मंगळवारी दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत गिरीश महाजन होते. यात विधान परिषद सभापतीपदाबाबत चर्चा करण्यात आली. भाजपकडेच हे पद जाणार असल्याने पक्ष कोणाला यासाठी संधी देणार याबाबत उत्सुकता होती.

हेही वाचा…चंद्रपूर : मुनगंटीवार समर्थक मुख्यमंत्री फडणवीसांच्या द्वारी, मंत्रिमंडळातील समावेशासाठी…

राम शिंदे आणि दरेकर या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा होती.सायंकाळी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते बुधवारी अर्ज भरणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कर्जत विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. परिषदेत महायुतीचे बहुमत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जातो. दरम्यान शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेश फडणवीस यांचे आभार मानले.

Story img Loader