अमरावती : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला काही दिवसांचा अवधी राहिला आहे. पण, राज्‍यातील महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे. दुसरीकडे, मंगळवारी महायुतीतील तीनही पक्ष आणि घटकपक्षांमध्‍ये समन्‍वयासाठी सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्‍ये समन्‍वयांची नियुक्‍ती करण्‍यात आली. त्‍यात बडनेरा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आमदार रवी राणा यांचे नाव समन्‍वयक म्‍हणून समोर आल्‍याने भाजपच्‍या स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे.

आमदार रवी राणा यांच्‍या पत्‍नी नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्‍ये प्रवेश केला. पण, त्‍यांना निवडणुकीत पराभव पत्‍करावा लागला. त्‍यानंतर आमदार रवी राणा यांनी सावधपणे पावले टाकण्‍यास सुरूवात केली आहे. गेल्‍या महिन्यात रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहींहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले, तेव्हा राणा यांनी भाजपमध्‍ये जाणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

हे ही वाचा…काँग्रेसच्या माजी आमदाराला वंचितकडून उमेदवारी; १० उमेदवारांची यादी जाहीर

नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा आग्रह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धरला होता, त्‍यानुसार नवनीत राणा यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला, मात्र लोकसभेच्या प्रचारादरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भविष्यात आमदार रवी राणा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येतील, असे मिश्किल वक्तव्य जाहीरपणे केले होते.

त्‍यावर उत्‍तर देताना रवी राणा म्‍हणाले होते की, नवनीत राणा जरी आपल्या भाजपसोबत आल्या तरी त्या तुमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. मी युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी भविष्यात कधीही भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही, हे स्पष्ट करतो. पण, आता जाहीर झालेल्‍या समन्‍वयकांच्‍या यादीत भाजपचे समन्‍वयक म्‍हणून रवी राणांचे नाव समोर आल्‍याने भाजपच्‍या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे.

हे ही वाचा…काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा

राणांनी भाजपचा प्रचार करावा-कुळकर्णी

ज्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केलेला नाही, त्‍यांचे नाव बडनेरा मतदारसंघासाठी समन्‍वयक म्‍हणून प्रसिद्ध केले जाणे हे भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांसाठी धक्‍कादायक आहे. पक्षाचे कार्यकर्ते त्‍यामुळे अस्‍वस्‍थ झाले आहेत. यासंदर्भात आपण पक्षाच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांसोबत बोलू. रवी राणा जर भाजपचे समन्‍वयक असतील, तर त्‍यांनी उद्यापासून त्‍यांच्‍या कार्यालयावर भाजपचा झेंडा आणि कमळ चिन्‍ह लावावे आणि भाजपचा प्रचार सुरू करावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.

यासंदर्भात आमदार रवी राणा यांच्‍याशी संपर्क साधला असता, त्‍यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. दुसरीकडे, अमरावती मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे समन्‍वयक म्‍हणून भाजपचे नेते व माजी राज्‍यमंत्री जगदीश गुप्‍ता यांचे नाव प्रसिद्ध झाल्‍यानेही अनेकांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे.