नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यापुढे ठेवून सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शनिवारी नागपुरात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

एकाच वेळी ५ हजार तरुण बसू शकतील असा मोठा मंडप कार्यक्रमस्थळी उभारण्यात आला असून तेथे ५० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यातील निम्मे म्हणजे २५ ऑनलाईन नोंदणीसाठी तर २५ नवीन नोंदणीसाठी आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान मेळाव्यात, ‘स्टार्टअप एक्सपो’ ही भरविण्यात येणार असून या आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा – वर्धा : चाईल्ड पोर्नोग्राफी! टेलिग्राम चॅनलवर प्रसारण करणाऱ्या विकृतास अटक

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांना मनस्ताप; इंदोर व बंगळुरूकडे जाणारी गाडी तब्बल दोन महिने रद्द, कारण काय?

सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेतच एक्सपो युवकांना बघता येणार आहे. मेळाव्यासाठी ५ हजार उमेदवार क्षमतेचे सभागृह, आकर्षक मंच, माहिती व सुविधा केंद्र, ऑनस्पॉट नोंदणीकक्ष, मुलाखतीसाठी स्वतंत्र कक्ष व्यवस्था, देशभरातून येणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी कक्ष तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मेळाव्यात स्टार्टअप संकल्पनेच्या माहितीपासून ते यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींबाबत तज्ज्ञांद्वारे माहिती देण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती देण्यासोबतच इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांचे निरसनही येथे केले जाणार आहे. मेळाव्यात स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनक्युबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.