नागपूर :  ‘नमो महारोजगार’  मेळावा म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा असून ती मेळाव्या संपल्यानंतरही कार्यरत राहील आणि त्याद्वारे प्रत्येकाला संधी मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके होते.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
Candidates delayed in applications due to seat allotment scandal between Mahavikas Aghadi and Mahayuti
पहिल्या दिवशी नाशिक पूर्व, मालेगाव बाह्यमधून दोन अर्ज दाखल

हेही वाचा >>> “भारतीय दंड, फौजदारी संहिता कायद्यात बदल आवश्यक”, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत; म्हणाले…

फडणवीस म्हणाले, हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा  मेळावा आहे.  केवळ मुलाखती घेऊन हा मेळावा संपणार नसून नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा आम्ही उभारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ दोन दिवसांचा नाही तर पुढेही अनेक दिवस चालणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१४ पासून मिहानकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. येथे आतापर्यंत ६८ हजार ७६७ तरुणांना प्रत्यक्ष आणि ३२ हजार १४१ तरुणांना अप्रत्यक्ष असा एक लाख ९ हजार ८ तरुणांना रोजगार मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत हा आकडा दोन लाखांपर्यंत जाईल असा विश्वास आहे.

या मेळाव्यासाठी ६० हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. ७९८ आस्थापना या ठिकाणी मुलाखतीसाठी आल्या आहेत. ४८ हजार ५४१ उपलब्ध जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी विद्यापीठ परिसरात तीन मोठी दालने उभारण्यात आली आहेत. 

मेळाव्याच्या नावावर भाजपचा प्रचार

मेळाव्याच्या ठिकाणी सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांचे छायाचित्र असलेले फलक झळकत होते. येथे नोंदणी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला  फडणवीस यांचे छायाचित्र असलेली व त्यावर नमो महारोजगार मेळावा लिहिलेली बॅग दिली जात होती.   द्वारापासूनच भाजपचे झेंडे, कमळाचे तोरण,  चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके यांची छायाचित्रे असलेले फलक झळकत होते. त्यामुळे या  मेळाव्यातून उपराजधानीत भाजपचा प्रचार केला जात आहे का, अशी चर्चा रंगली होती.