नागपूर : ‘नमो महारोजगार’ मेळावा म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा असून ती मेळाव्या संपल्यानंतरही कार्यरत राहील आणि त्याद्वारे प्रत्येकाला संधी मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके होते.
हेही वाचा >>> “भारतीय दंड, फौजदारी संहिता कायद्यात बदल आवश्यक”, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत; म्हणाले…
फडणवीस म्हणाले, हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा मेळावा आहे. केवळ मुलाखती घेऊन हा मेळावा संपणार नसून नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा आम्ही उभारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ दोन दिवसांचा नाही तर पुढेही अनेक दिवस चालणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१४ पासून मिहानकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. येथे आतापर्यंत ६८ हजार ७६७ तरुणांना प्रत्यक्ष आणि ३२ हजार १४१ तरुणांना अप्रत्यक्ष असा एक लाख ९ हजार ८ तरुणांना रोजगार मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत हा आकडा दोन लाखांपर्यंत जाईल असा विश्वास आहे.
या मेळाव्यासाठी ६० हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. ७९८ आस्थापना या ठिकाणी मुलाखतीसाठी आल्या आहेत. ४८ हजार ५४१ उपलब्ध जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी विद्यापीठ परिसरात तीन मोठी दालने उभारण्यात आली आहेत.
मेळाव्याच्या नावावर भाजपचा प्रचार
मेळाव्याच्या ठिकाणी सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांचे छायाचित्र असलेले फलक झळकत होते. येथे नोंदणी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला फडणवीस यांचे छायाचित्र असलेली व त्यावर नमो महारोजगार मेळावा लिहिलेली बॅग दिली जात होती. द्वारापासूनच भाजपचे झेंडे, कमळाचे तोरण, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके यांची छायाचित्रे असलेले फलक झळकत होते. त्यामुळे या मेळाव्यातून उपराजधानीत भाजपचा प्रचार केला जात आहे का, अशी चर्चा रंगली होती.