गोंदिया – एका मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे आमदार धीरज देशमुख यांनी “जय बेळगाव, जय कर्नाटक” अशी घोषणा दिली होती. देशमुख यांनी फेटा घालून दिलेल्या या घोषणेची सर्वत्र चर्चा असताना या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया दिली आहे. “धीरज देशमुख यांच्या अशा घोषणेबद्दल मी ऐकले आहे, वर्तमानपत्रातून वाचले आहे. त्यावेळी नेमकी काय घटना झाली याबद्दल सविस्तर तपासूनच मी माझे मत व्यक्त करणार”, असे नाना पटोले म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेळगावचा मुद्दा काही दिवसांपूर्वी दोन राज्यांतील भाजपाचे मुख्यमंत्र्यांपासून तर देशातील गृहमंत्रीपर्यंत पोहोचला. यावर सामंजस्याने तोडगा काढावा, अशी सूचना त्यावेळी गृहमंत्री यांनी दिली होती. पण, सध्या आमदार धीरज देशमुख यांच्या अशा घोषणेबद्दल मी एकले आहे, वर्तमापत्रातून वाचले आहे. त्यावेळी नेमकी काय घटना झाली याबद्दल सविस्तर तपासूनच मी माझे मत व्यक्त करणार, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा – एका सुंदर सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व; भारतीय संशोधकांचाही मोलाचा वाटा

हेही वाचा – वर्धा : पाचव्या वर्गातील गौरीने केला शंकरपटास प्रारंभ; मध्यप्रदेशसह विदर्भातील १०० बैलगाड्यांची थरारक स्पर्धा

या संदर्भात मी स्वतः आमदार धीरज देशमुख यांच्याशी बोलणार. कारण अलीकडच्या काळात संभ्रम निर्माण केले जातात. त्यामुळे देशमुख यांच्याशी याबद्दल माहिती घेऊनच या प्रकरणावर काय ते बोलता येईल, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole comment on dheeraj deshmukh jai belgaum jai karnataka slogan sar 75 ssb
Show comments