नागपूर : भाजपा राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तपास थांबवण्यात येतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हे आरोप फेटळून लावले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपा नेतृत्वावर ईडी कारवाईवरून टीका केली आहे. “मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – वॉट्सॲपवर ओळखी, सांगलीचा आरोपी, कोल्हापुरात बलात्कार अन् वर्धेत गुन्हा दाखल
हेही वाचा – कापसाच्या भावात अस्थिरता; उत्पादक शेतकरी संभ्रमात
भाजपाविरोधी पक्ष नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी तपास यंत्रणांचा भाजपाकडून वापर होत आहे. संबंधित नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तपास थांबवला जातो, असा आरोप पटोले यांनी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या नेत्याचा तपास थांबवण्यात आला, असा प्रतिसवाल करून विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले. त्यासंदर्भात नागपुरात नाना पटोले यांना विचारले असता, फडणवीस आणि मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे. त्यांना वाटते कोणाला काही कळत नाही. ठाण्यातील दोन नेत्यांवरील कारवाई थांबण्यात आली. यासंदर्भातील यादी काँग्रेसच्या नेत्याने यापूर्वीच जाहीर केली आहे. खोटे बोल, पण रेटून बोल याप्रमाणे फडणवीस यांचे सुरू आहे, अशी टीका पटोले यांनी केली.