नागपूर : देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करून तरुणांचे आयुष्य बरबाद केले. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माफी मागायला सांगावी, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा – सोन्याच्या दरात मोठी उसळी, आजचे दर पहा…

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के

हेही वाचा – कंत्राटी भरतीच्या आदेशावरून भाजपाचे महाविकास आघाडीविरोधात आंदोलन; “शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी माफी मागावी”, बावनकुळेंची मागणी

पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे भाजप नेते सातत्याने खोटे बोलत असतात. कंत्राटी भरतीमध्येही फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील जनता विशेषतः तरुण मुले-मुली यांना हा खोटारडेपणा समजतो. राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी, तलाठी भरतीमधील घोटाळा, हे पाप भाजपाचेच आहे. काही तरुण मुले मुली दोन-तीन वर्षांपासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकले नाहीत. एमपीएससीचा सावळा गोंधळ सुरूच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी अत्यंत जबाबदार व महत्त्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वतःचे पाप दुसऱ्यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असेही पटोले म्हणाले.