लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : काँग्रेस पक्षाच्या आज चंद्रपूर येथे मेळावा आहे. कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले जातील आणि त्या माध्यमातून उमेदवारी बाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते आज सकाळी नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्त्यवार ते म्हणाले, मी जर तर वर विश्वास ठेवत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी महाराष्ट्र, महाराष्ट्रातील शेतकरी तरुण यांचे प्रश्न महत्वाचे आहे. विचार वाचवणे, शेतकरी वाचून तरुणांना गरिबांना न्याय देणे हे म्हत्वाचे आहे.

काँग्रेस मुख्यमंत्रीपदावर दावा करेल काय असे विचारले असता, हा चर्चेचा विषय नाही लोकशाहीत जनता आपल्या मताने सरकार बनवते जर तर वर न जाता ज्यांनी विकासाचा मॉडेल नावाने अवदसा केली, राष्ट्रपतीने त्यावर टिपणी केली आहे. हा नकली आणि भ्रष्टाचारी विकास करणाऱ्यांना सत्तेबाहेर काढणे यावर आमचे लक्ष आहे.

आणखी वाचा-Amravati Accident Update : मेळघाट बस अपघातात सहा जणांचा मृत्‍यू

नागपूर येथील पक्षाच्या मेळाव्यात आमदार विकास ठाकरे आणि प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे असे वक्तव्य केले. त्यावर नाना पटोले म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना असे वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. मी मुख्यमंत्री व्हावे हे कार्यकर्त्यांना वाटते पण तो विषय आजचा नाही. महाराष्ट्र गुजरातला विकायला काढणाऱ्या भाजप युती सरकारला सत्तेतून घालवणे हा विषय आहे. निवडणुकीनंतरच महाविकास आघाडी नेते बसून यावर निर्णय घेतील.

दरम्यान, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील सर्व ६ विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार)कडून इच्छुक नाराज आहेत.

आणखी वाचा-आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार

काँग्रेसतफें राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तसेच, जिल्हानिहाय आढावाही घेतला जात आहे. कोणत्या मतदारसंघात पक्षाची ताकद किती, सहकारी पक्ष किती बळकट, विजयाचे सूत्र कसे असेल याबाबतही चर्चा केली जात आहे. नागपूर शहरात ६ विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ च्या निवडणूक पश्चिममधून शहराध्यक्ष विकास ठाकरे तर, उत्तर मधून माजी मंत्री नितीन राऊत असे दोघे विजयी झाले. तर, दक्षिण व मध्य असे दोन मतदारसंघात काँग्रेसचा निसटता पराभव झाला. यावेळी पक्षाने सर्व सहाही मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. सहकारी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने शहरातही काही जागांची मागणी केली असली तरी संघटनात्मक रचना व विजयाची शक्यता यावर उमेदवारी ठरणार आहे. यानुसार कॉंग्रेसचा दावा शहरात बळकट आहे. लोकसभा निवडणूक भाजप उमेदवाराचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे पक्षाकडून चांगले उमेदवार देऊन संघटीतपणे निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole gave a reaction about becoming chief minister rbt 74 mrj