वाशीम : राज्याला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. मात्र भाजप सरकार देशात मनुवाद लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत जोडो यात्रेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज, सोमवारी वाशीम येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार झनक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सध्याचे भाजप सरकार मनुवादी धोरण जनतेवर थोपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोरगरिबांचे शिक्षण बंद करून सीबीएसई पॅटर्नच्या शाळांना पाठबळ देत आहे. सध्या हर हर महादेव या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्यहनन केले जात आहे. त्या काळातही शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे आज सत्तेत आल्यावर लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत आल्याचेही नाना पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole har har mahadev movie shivaji maharaj character assassination from the movie vashim tmb 01