प्रशांत देशमुख

वर्धा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यपद्धती बालिश व हिंदुत्ववादी विचारांना प्रोत्साहन देणारी आहे. त्यांना न बदलल्यास काँग्रेसचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल, असा इशारा नाराज काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. प्रामुख्याने अल्पसंख्याक व मागासवर्गीय नेत्यांनी आपली भावना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना चार पानी इंग्रजीतून लिहलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. हे नेते म्हणतात की, पटोले यांची प्रत्येक कृती निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारी ठरत आहे.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, तसेच आदिवासी, दलित समाज हा कांग्रेसचा आधार आज नाराज झाला आहे. राज्यातील ४८ पैकी केवळ एकच जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक समाजाचा असून विदर्भात तर एकही जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा प्रमुख पदावर नाही. भाजपच्या नेत्यांना पटोले संधी देतात. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भंडारा व गोंदिया या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे दिसून आले.

हेही वाचा >>> साहित्य अकादमी नोकरशहा चालवतात!, महेश एलकुंचवार यांचे परखड मत

राजस्थानच्या चिंतन शिबिरात नव्या पण निष्ठावंत चेहऱ्याना संधी देण्याचे ठरले होते. मात्र, राज्यात त्याची अंमलबजावणी नाहीच. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ आंदोलनात सहभागी के. के. पांडे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियास पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा पटोले यांनी केली होती. पण अद्याप देण्यात आली नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पटोले यांनी नाराज केले. प्रदेश कार्यकारिणीत बदल न झाल्यास आगामी निवडणुकांत काँग्रेसला मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या नेत्यांनी दिला आहे. निवेदनावर प्रकाश मुगदिया, बंडू मल्लेलवार, ऍड माजिद कुरेशी, हर्षवर्धन निकोसे, महेंद्रसिंग सलूजा, आर एम खान नायडू, इकराम हुसेन, रवी शिंदे, मनोज बागडे, विजय बाहेकर, राजेंद्र शर्मा, प्रल्हाद ठाकरे व अन्य आजी माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Story img Loader