नागपूर: विधानसभा निवडणुकीतील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे (एमपीसीसी) अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला लवकरच बैठक बोलावून नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील पराभवाचे विश्लेषण करतील. यावेळी पटोले यांनी केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावावरही तीव्र टीका केली. त्यांनी हा प्रस्ताव देशातील लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. “शासन प्रणाली केंद्रीकृत करण्यासाठी आणि संघराज्य प्रणालीला कमकुवत करण्यासाठी हा प्रस्ताव राबवला जात आहे. संसाधन वाचवण्याच्या नावाखाली सरकार नागरिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असे पटोले म्हणाले.

beed parbhani case
Maharashtra Assembly Session: “सिगरेटच्या लायटरनं त्याचे डोळे जाळले, मृतदेहावर उड्या मारल्या”, विरोधी पक्षांकडून बीड घटनेचा निषेध करत सभात्याग!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Chandrashekhar Bawankule (5)
भुजबळ-मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे दोन्ही नेते…”
Chhagan Bhujbal
“मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली
Uday Samant on Shivsena MLA's Unhappy over dropped form Cabinet (1)
“आम्हाला दोन महिन्यात मंत्रिपद गमावण्याची भीती”, आमदारांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत स्पष्ट बोलले
Sanjay Raut on Chhagan Bhujbal
“भुजबळांचा वापर करणाऱ्यांनीच आज त्यांना…”, मराठा आरक्षण विरोधी आंदोलनावरून संजय राऊत यांची खोचक टीका
Chhagan Bhujbal
Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates : “ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा – ‘हा तर मुनगंटीवार यांच्यावर अन्याय’, समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया

पटोले यांनी इशारा दिला की, या उपक्रमामुळे लोकशाही सहभाग आणि जबाबदारी यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. “वन नेशन, वन इलेक्शन ही केवळ एकत्रित निवडणुकांपुरती मर्यादित कल्पना नाही; ती विविध आवाज दाबण्याची आणि राज्यांचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग कमी करण्याची पद्धत आहे,” असे त्यांनी सांगितले.

सरकारकडून जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी राजकीय अजेंडा पुढे रेटण्यावर भर दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “या सरकारच्या योजनांमुळे देशाच्या संघराज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो,” असे त्यांनी नमूद केले.

राजकीय पराभवानंतर काँग्रेसमधील नाराजी वाढत असताना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली असून पक्षाची आगामी आढावा बैठक ही पक्षाची धोरणे नव्याने उभारण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरील टीकेमुळे विरोधकांचा देशाच्या राजकीय व लोकशाही भवितव्याबद्दलचा आक्रोशही प्रकर्षाने समोर आला आहे.

हेही वाचा – महायुतीच्या आमदारांचे गुरुवारी ‘ बौद्धिक ‘, अजित पवार रेशीम बागेत जाणार का ?

पूर्वीच्या घडामोडी काय?

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीला गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पादाचा राजीनामा देण्याची तरयारी दर्शविली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आता नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती आहे.

Story img Loader