नागपूर : चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल तर ही चूक आम्ही वारंवार करू, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या मुद्यावर संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने अवमान प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि लोकसभा सचिवालयाने तातडीने पावले उचलच राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. काँग्रेसने हे भाजपचे षडयंत्र असल्याचे सांगून न्यायालयाचे केवळ नाव आहे, असा आरोप केला आहे. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्यांना वाटते ते सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत. ललित मोदी, निरव मोदी यांनी जनतेचा पैसा लुटला. त्यांना चोर नाही तर काय म्हणणार. चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल तर काँग्रेस ही चूक वारंवार करेन, असेही नाना पटोले म्हणाले.

Story img Loader