नागपूर : भाजपा सरकारने चौकाचौकांमध्ये रोषणाईकरिता वीज चोरली. आता सर्वसामान्यांच्या विजेच्या देयकातून त्याची वसुली केली जात आहे. भाजपा म्हणजे पाकिटमार असून, जनतेचा खिसा कापण्याचे काम ते करीत आहेत, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात देवडिया भवनात महापालिका निवडणूक आढावा बैठक पटोले यांनी गुरुवारी घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. जी-२० परिषदेसाठी नागपुरात विशेषत: सिव्हील लाईन्स आणि वर्धा मार्गावर रोषणाई करण्यात होती. यावेळी काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकरण समोर आले होते. तो संदर्भ देत पटोले यांनी भाजपाला लक्ष्य केले.

हेही वाचा – वर्धा : अवकाळी पावसामुळे भाजीपाला स्वस्त, शेतकरी मात्र त्रस्त

बैठकीला शहर अध्यक्ष विकास ठाकरे, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, आमदार अभिजित वंजारी, प्रशांत धवड, दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, गजराज हटेवार, पुरुषोत्तम हजारे प्रामुख्याने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole said expenses of lighting for g 20 will be recovered from electricity bill of common people rbt 74 ssb