नागपूर : छगन भुजबळांना त्रास होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, भाजपा हा ओबीसीची नेतृत्वाची नेहमीच अवहेलना करते आला आहे. ओबीसी नेता भाजपाच्या सानिध्यात असेल तर त्याला टार्गेट केले जाणारच. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अधक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

हेही वाचा >>>नांदेड, छत्रपती संभाजीनगरसाठी नागपूरहून विमानसेवा लवकरच

पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे असेल तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. काँग्रेसने सर्व जागांवर तयारी केली तर त्याचा फायदा मित्रपक्षांनाही होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी मेरिटचा विचार केला असता तर आणखी चांगले परिणाम दिसले असते. राज्यातील भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महत्वाचे आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने योजना करुन कोट्यवधी रुपये लुटले आहेत. डीबीटी योजनेतून टेंडर न काढता मुख्यमंत्र्यांनी खरेदी करुन लुट केली. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत पण त्यांच्या नावावर लुट मात्र सुरु आहे. बांधकाम विभागाच्या जागा तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे. राज्याच्या जनतेला कर्जात डूबवण्याचे काम सुरु आहे, या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारु असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>>निवडून येताच प्रतिभा धानोरकरांनी दिला राजीनामा, आता नवीन जबाबदारी

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, छगन भुजबळांना त्रास होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. याच छगन भुजबळांना तुरुंगात टाकले होते, त्यावेळी ते डाकू होते आता ते संन्यासी झाले आहेत. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते, मात्र नको आहेत.

 नीट परीक्षा रदद् करून सीबीआय चौकशी करा

नीट परीक्षेत केवळ ग्रेस मार्क्सचा मुद्दा नव्हता तर या परीक्षेत घोटाळा झालेला आहे, पेपर फुटला आहे हे गंभीर आहे. नीट परीक्षेला बसलेल्या देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. परीक्षा केंद्र व खासगी शिकवणी वर्गाच्या मालकांची  अभद्र युती झालेली आहे आणि त्यातून हा घोटाळा झालेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार एटीएच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपली जबाबदारी झटकू पहात आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Story img Loader