नागपूर : एका शानदार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता पुढील टप्प्यात मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, विरोधीपक्षांनी भाजप प्रणित नवीन सरकार गुजरातधार्जिणे असल्याची टीका केली आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमाला धक्का लागण्याची भिती काही मुद्दे उपस्थित करून व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’: उत्तरतालिका जाहीर; पूर्व परीक्षा २०२४ संदर्भात महत्त्वाची बातमी…

महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन्यासाठी कसरत करावी लागली. एकनाथ शिंदे अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करुन मंत्रीपदांची भिक मागण्याची वेळ या दोघांवर आली.

मोदी शाह यांच्या मेहरबानीवर शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. एकनाथ शिंदे यांची तर भाजपाला आता काहीच गरज नाही त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजपा व मोदी शाह यांनी जागा दाखवून दिली आहे. भाजपाने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपवले आहे.

हेही वाचा – नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू

भाजपाचे सरकार स्थापन झाले असून निवडणूक त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपाची विज बिल माफ, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये, २.५ रिक्त सरकारी पदांची भरती याची तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसची फडणवीस सरकारकडून अपेक्षा

१)नव्या सरकारने शेतकरी कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार रु. भाव, लाडक्या बहिणींचे २१०० रुपये व २.५ लाख पदांची नोकरभरती तात्काळ सुरु करावी.

२)काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारु.

३)गुजरातधार्जिण्या नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole statement regarding the new government devendra fadnavis rbt 74 amy