गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच गोंदिया भंडारा जिल्ह्याला एक मोठी संधी लाभत आहे.जिल्ह्यातील माणूस राज्यातील सरकारच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहे करिता जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात मला साथ द्यावी आणि माझ्या आघाडीचे आमदार निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया शहरातील न्यू लक्ष्मी नगर येथील सभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान केले. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार रमेश कुथे , काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकडे उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले की महायुतीची भ्रष्टाचारी सरकारला हाकलून लावण्याच्या मानस संपूर्ण राज्यातील जनतेने केलेला आहे. समोर आपला पराभव पाहून या महायुतीचे देवेंद्र फडणवीस रडीचा डाव खेळण्यापर्यंत आलेले आहेत आणि वोट जिहादची भाषा करू लागले आहे. आपल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्याला सांभाळून शकलेले त्यांचे मुख्यमंत्री योगी महाराष्ट्रात येऊन या संत महापुरुषांच्या भूमीत “बटेंगे तो कटेंगे” ची भाषा करतात यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे वैभव आमचे दैवत शिवाजी महाराजांची मालवण येथील प्रतिमा सुद्धा भ्रष्टाचाराचा बळी चढली.
हेही वाचा…विदर्भातील सर्व सभा तडकाफडकी रद्द करून अमित शहा दिल्लीला
m
कुठे भ्रष्टाचार करावा आणि कुठे नाही या बाबीची लाज लज्जा या लोकांना नाही.
अशा निगरगट्ट लोकांना परत सत्तेत येता कामा नये. करिता जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने दोन्ही जिल्ह्यातून निवडून द्यावे असे आव्हान मी दोन्ही जिल्ह्यातील जनतेला करण्याकरिता आपल्या स्वतःच्या साकोली मतदारसंघातील प्रचार सोडून इतरत्र जिल्ह्यात आणि राज्यात फिरत आहे.
गोंदिया हे माझे जन्मस्थान आहे या जिल्ह्याच्या एक आगळावेगळा विकास करणे हे माझे पण स्वप्न आहे आणि याकरिता या शहरातील माणूस मुख्यमंत्रीपदी बसला तर तो आपल्या शहर आणि जिल्ह्याला किती उंचीवर घेऊन जाऊ शकतो ही कल्पना आपण जनतेने करावी. माझे पण याकरिता पूर्ण प्रयत्न राहणार आहे. या जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने गोंदियातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करून टाकलेले आहे. महाविकास आघाडीची सरकार आल्यास गोंदिया येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उघडणार तसेच गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाची निर्माणधीन इमारती चे काम रखडत रखडत सुरू आहे, तिला गती देणार, गोंदिया जिल्ह्यात अदानी व्यतिरिक्त कोणताही मोठा उद्योग नाही करिता जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळावे करिता येथे उद्योगांना आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार हे माझे स्वप्न आहे. याकरिता आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पुढील २० नोव्हेंबर या तारखेला मतदान करावे, असे आव्हान ही नाना पटोले यांनी उपस्थित जनतेला केले.