विदर्भ राज्याची भूमिका चळवळीच्या माध्यमातून जोरकसपणे मांडणारे विदर्भवादी ज्येष्ठ नेते नानाभाऊ एंबडवार यांनी आणीबाणीच्या काळात काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी आणीबाणीत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना साथ देण्याचे समर्थन केले होते, हे येथे विशेष.
दोनदा आमदार राहिलेले आणि धोटे यांच्या खांद्याला खांदा लावून विदर्भाच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणारे नानाभाऊ एंबडवार सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.
राममनोहर लोहिया यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघाला एकत्र आणले होते. देशात मोठी चळवळ उभी झाली होती. त्यादेशातील सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून इंदिरा गांधी यांची कोंडी केली होती. मुळे इंदिरा गांधी घाबरल्या आणि त्यांनी आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही विरोधात होतो. भाऊ (जांबुवंतराव धोटे) खासदार होते. त्यांनी इंदिरा गांधी यांचे राजकारण आणि त्यांच्या कामाचा आवाका बघितला होता.
देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता इंदिरा गांधी करू शकतात, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला १९७७ ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु अशाप्रकारे आणीबाणीला पाठिंबा देणे ही आमच्याकडून झालेली मोठी चूक होती, असे एंबडवार म्हणाले.
छोटी राज्य प्रशासन आणि विकासाच्या दृष्टीने योग्य आहेत. छत्तीसगडकडे बघितल्यास याचा प्रत्यय येईल. विदर्भ झाल्यास इतर राज्याप्रमाणे मुंबईतील उत्पन्नाचा काही वाटा विदर्भाला देखील मिळेल, असेही ते म्हणाले. विदर्भाच्या चळवळीला यवतमाळातून प्रारंभ केला आणि संपूर्ण विदर्भात त्याचे लोण परसले. काँग्रेससोबत गेल्याने चळवळीला धक्का बसला काय, असे विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसमध्ये जहागीरदारी होती. या पक्षातील सुभेदारांविरुद्ध बोलणाऱ्यांना टिकू दिले जात नव्हते. अशा वातावरणात आमच्या चळवळीने विदर्भातील सामान्य जनतेला बोलायला आणि लढायला शिकवले.
आणीबाणीच्या वेळी काँग्रेससोबत गेलो ही चूकच – नानाभाऊ एंबडवार
देशातील सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून इंदिरा गांधी यांची कोंडी केली होती.
Written by मंदार गुरव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-10-2015 at 04:52 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanabhau embadavara says it was my mistake i want with congress in the emergency