गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज गतिमान व्हावे व त्यात पारदर्शकता यावी तसेच संस्थांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण व्हावी आणि सन २०३० पर्यंत सतत विकासाचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी पंचायतराज संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्काराची योजना केंद्रस्तरावर आखण्यात आली. राष्ट्रीय पंचायतराज सन २०२४ अंतर्गत नानाजी देशमुख पंचायत समिती सतत विकास पुरस्कार २०२४ साठी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समिती राज्यात अव्वल ठरली. या पुरस्काराचे वितरण बुधवार ११ डिसेंबर रोजी दिल्ली विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. तिरोडा पंचायात समितीच्या सभापती कुंता पटले व खंडविकास अधिकारी सतीश एम. लिल्हारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रामीण भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून सतत विकासाचे लक्ष्य समोर ठेवून काम केले जाते. विकास कामांना गतिमान करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे आणि पारदर्शक व्हावे आणि विकासाचे उद्देश गाठता यावे, यासाठी केंद्र शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पंचायत पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत एकूण ७ श्रेणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यांकन करून पुरस्काराने सन्मानित केले जाते.

हेही वाचा…लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’

सन २०२४ च्या नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत समिती सतत पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीने उत्कृष्ट कामकाजाच्या बळावर राज्यात पहिला तर देशात तिसरा क्रमांक मान पटकाविला आहे. या पुरस्काराचे श्रेय सर्व तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी आणि तिरोडा पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकारी आणि याकरिता मुलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना असल्याचे तिरोडा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी सतीश एम. लिल्हारे यांनी सांगितले.

हेही वाचा…नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…

या कामगिरी करिता मिळाला पुरस्कार

पंचायतराज विभागाच्या विविध योजनांची सात्यतपुर्ण अंमलबजावणी व पीडीआय डाटा वेळेत पूर्ण करण्यात तिरोडा पंचायत समितीचे काम सर्वोत्कृष्ठ ठरले आहे. त्यामुळे देशात तिसऱ्या क्रमांक प्राप्त करणाऱ्या तिरोडा पंचायत समिती प्रशासनाने गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पुरस्कार स्वरुपात तिरोडा पंचायत समितीला १ कोटी ५ लाख रुपये मिळाले आहे. यातून तालुक्यात विकास कामे करण्यास मदत होणार आहे.

Story img Loader