९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी आज शनिवारी वर्धेतच आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली.
हेही वाचा – चंद्रपूर : विदेशात पायलट असल्याचे सांगून तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन्…
हेही वाचा – वर्धा : विद्रोहीच्या विचार यात्रेने लक्ष वेधले
प्रस्थापित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विचारधारेविरुद्ध विद्रोहींचे संमेलन असते. अनेकदा या दोन्ही संमेलनातील परस्पर विरोधी भूमिकांचीच चर्चा जास्त होते. या संमेलनातील लोक तिकडे आणि तिकडचे इकडे फारसे येत नाहीत. परंतु, नरेंद्र चपळगावकर यांनी या संकेताला अगदी ठरवून फाटा दिला. ते स्वत: विद्रोहींच्या मांडवात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग हेसुद्धा उपस्थित होते. विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून यावेळी चपळगावर यांचे स्वागत करण्यात आले.