नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केले आहे.परंतु, पंतप्रधान पदाच्या आपल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकदाही संघ मुख्यालयाला किंवा स्मृती मंदिराला भेट दिली न्हवती. गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार आहे.

यावेळी मोदी संघाच्या रेशीमबागेच्या स्मृतिमंदिर स्थळाला भेट देणार आहेत. यावेळी संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान स्मारक समितीच्या वतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. त्यातच आता मोदींनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्यासोबतच्या सलग तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव राहिला या बद्दल सविस्तरपणे माहिती दिली. यावेळी संघाला समजणे इतके सोपे नाही असेही मोदी म्हणाले.

गावच्या शाखेत जायचे मोदी

मोदी पुढे म्हणाले की, त्यांच्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा चालू होती, तिथे ते खेळत असायचे, देशभक्तीपर गाणी गायचे, ती ऐकून मनाला खूप बरे वाटायचे आणि हृदयाला स्पर्शून जायचे. मोदींनी पुढे नमूद केले, ‘असेच, मी संघात सामील झालो.’ संघाचे माझ्यावर संस्कार होते, ‘काहीही विचार करा आणि कार्य करा, जर तुम्ही इतका अभ्यास करावा की देशासाठी उपयुक्त होण्याचा विचार करावा, असा व्यायाम करा की तो देशासाठी उपयुक्त ठरेल.’

संघाला समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे

पंतप्रधानांनी पुढे संघाच्या तळागाळातील कामाविषयी सांगितले आहे. ते म्हणाले, ‘यावर्षी संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगात आरएसएसपेक्षा मोठा ‘स्वयंसेवक संघ’ नाही. कोट्यावधी लोक संघाशी जोडलेले आहेत. मोदी असेही म्हणाले की, ‘संघाला समजून घेणे इतके सोपे नाही. त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’ संघ जीवनाला एक उद्देश आणि दिशा देतो. देश हेच सर्वस्व आहे आणि लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे. धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितले आहे, स्वामी विवेकानंदांनी जे काही सांगितले आहे, संघही तेच करतो. ‘आरएसएस महिला, युवक आणि कामगारांशी जोडलेले आहे.भारतीय मजदूर संघ ही एक मोठी संघटना आहे. कोट्यवधी सदस्य आहेत. डाव्या विचारसरणीच्या कामगार चळवळीला ‘जगातील कामगारांनो, एकत्र या!’ असे नाव देण्यात आले. तर कामगार संघटनेने ‘कामगारांनो, जगाला एकत्र करा!’ असा नारा दिला आहे असेही मोदी म्हणाले.

Story img Loader