प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षेच्या निकालाची इच्छुकांना प्रतीक्षा आहे. असे असतांनाच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशभरातील ३८ वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द केली आहे. तर १०२ महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे तीन हजार आठशे जागांचे काय, हा प्रश्न पुढे आला आहे.

Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
Sunil Tingre notice, Supriya Sule, Sharad Pawar,
कल्याणीनगर अपघात प्रकरण : आमदार सुनील टिंगरे यांनी पाठविलेल्या नोटीशीत ‘यांची’ही नावे !
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

‘नीट’ नंतर समुपदेशन होते. त्या प्रक्रियेत सुद्धा या महाविद्यालयांचा समावेश होणार की नाही, याबाबत अनभिज्ञता आहे. जुलै ऑगस्ट मध्ये समुपदेशन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची नावनोंदणी व अन्य प्रक्रियेस वेग येणार. मान्यता रद्द झाल्याचा त्यावर परिणाम होणार का, अशीही विचारणा होत आहे.

हेही वाचा… भंडारा : खळबळजनक! जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’, कोतवाल भरती परीक्षा

ही मान्यता काही अनियमिततेमुळे रद्द करण्यात आली आहे. तामिळनाडू, आसाम, गुजरात व अन्य काही राज्यातील ही महाविद्यालये आहेत. येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान उच्च शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ.ललित वाघमारे हे म्हणाले की या महाविद्यालयांना तूर्तास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून एक महिन्यात उत्तर द्यायचे असल्याचे ते म्हणाले.तर अन्य एका वैद्यकीय तज्ञाने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार नसल्याची शक्यता वर्तविली. यातील बरीच वैद्यकीय महाविद्यालये शासकीय आहेत. तिथे काय अनियमितता आहे हे सरकारला माहीत असणारच. त्यामुळे वेट अँड वॉच हेच योग्य ठरेल.