नागपूर : राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था व्हीएनआयटीद्वारा आजवर रसायनशास्त्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी यासह अनेक क्लिष्ट विषयांवर संशोधन करण्यात आले. देशभरातील विविध नागरी समस्यांवर प्रत्यक्ष उपाययोजना काढणे तसेच अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये सल्लागार म्हणून  कार्य केले आहेत. आता व्हीएनआयटीच्यावतीने भारतीय कालगणनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी अत्याधुनित तिथी व नक्षत्र यंत्राची निर्मिती करण्यात आली. या यंत्राची स्थापना नागपूरमधील हिंगणा येथील कान्होलीबारा स्थित आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्कमध्ये स्थापना करण्यात आली असल्याची माहिती व्हीएनआयटीचे संचालक प्रेमलाल पटेल यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> फडणवीसांच्या उपस्थितीत पिठाधीश म्हणाले, चवदार वाटत असेल तर मांसाहार करायला हवा….

काय आहे नक्षत्र यंत्र ?

जगभरात ग्रेग्रोरियन कैलेंडर व कालगणना प्रचलित आहे. भारतीय कालगणना ही वैज्ञानिक व ग्रह नक्षत्रांवर आधारित असून, सामान्य लोकांना याची माहिती नसल्यामुळे प्रचलनात नाही. सामान्यपणे तिथी ही व्रत, मुहूर्ते व सणांच्या निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे. अमावस्या, पौर्णिमा, कोजागरी, विजयादशमी, चतुर्थी, एकादशी याबाबत लोकांना माहिती आहे, मात्र त्यामागील कारणे माहित नसल्यामुळे व्हीएनआयटीच्यावतीने तिथी व नक्षत्र यंत्राचे संशोधन करण्यात आली असल्याचे प्रेमलाल पटेल यांनी सांगितले. शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांना हे आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्क वैदिक विज्ञान व आधुनिक विज्ञानाची माहिती देणारे विदर्भातील एकमेव पर्यटन स्थळ आहे. आतापर्यंत या विषयावर कुठेही संशोधन झाले नाही. हे संशोधन विदर्भवासियांसाठी कौतुकाची गोष्ट आहे. याचे लवकरच पेटेंट होणार असून या संशोधनाचे अहवाल जगभरात लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. असेही डॉ. प्रेमलाल पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ॲट्रासिटी कायद्याचे उल्लंघन, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

कसे कार्य करणार? ग्रहांच्या भ्रमणीनुसार दिवस, वार, महिना व वर्ष यांची उत्पत्ति भारतीय ऋषीनी केली. जेव्हा चंद्र १२ अंश सूर्याच्या पुढे सरकतो त्या काळास तिथी असे म्हणतात. याप्रमाणे प्रत्येक १२ अंशाला एक तिथी तयार होऊन संपूर्ण एका चंद्राच्या पृथ्वीभोवती परिभ्रमणांत म्हणजे ३६० अंशात ३० तिथी तयार होतात. यावरून ३० दिवसांचा महिना हा सिद्धांत प्रचलनात आला आहे. तिथी ही चंद्र भ्रमणावर आधारित असल्यामुळे चंद्राच्या शीघ्र किंवा मंद गतीनुसार तिथीचा काळ ठरतो. कधी १८ तास तर कधी २७ तास असा हा कालावधी असतो. हे यंत्राद्वारे तयार करण्याचे अत्यंत कठीण कार्य व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात करून दाखविले. या संशोधनाला एक वर्ष लागला. मार्च २०२४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या पार्कला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना नक्षत्र यंत्राबाबत माहिती देण्यात आली होती अशी माहिती तत्कालीन संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National research institute vnit created nakshatra yantra tpd 96 zws