वर्धा: आयआयटी, नीट तसेच इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था तसेच विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी तीव्र चुरस असते. म्हणून निवड करण्यासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जे ई ई ही परीक्षा घेतली जाते. जेईई मेन २०२४ साठी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने नोंदणी सुरू केली आहे.
३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. एजेन्सी कडून शहराची माहिती पत्रिका दिल्या जाणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची व शहराची माहिती मिळू शकेल. एनटीए च्या वेबसाईट वरून अर्ज करता येणार. तसेच याच वेबसाईट वरून तीन दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध होणार. या परीक्षेचे निकाल १२ फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात येणार आहे.
हेही वाचा… सावधान! येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
इंग्रजी, हिंदीसह विविध तेरा भाषांत ही परीक्षा घेतली जात असते. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सत्र एक किंवा सत्र दोन तसेच दोन्हीत उपस्थित राहण्याचा पर्याय आहे.जर विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्राच्या परीक्षा दिल्या तर अंतिम निकालात सर्वोत्तम गुणांचाच विचार केल्या जाणार.