वर्धा : देशात होते त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण शैक्षणिक संस्था व विद्यापीठांचे गुण देत मानांकन होते. त्यात अव्वल असणाऱ्या विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी धडपडत असतात. आता अशाच विद्यापीठात सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन अभिमत विद्यापीठाचा डंका वाजला आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर ही क्युएस रँकिंग २०२४ नुसार आशियातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था ठरली आहे. या संस्थेच्या तसेच मलेशिया येथील युसीएसआय विद्यापीठात मेघे विद्यापीठाच्या स्कुल ऑफ अलाईड  सायन्सच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या विद्यापीठाच्या आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या ग्लोबल इमर्शन  प्रोग्राममध्ये हे विद्यार्थी चमकले आहे. या संस्थेच्या बीबीए अभ्यासक्रमचा विदयार्थी आर्यन काळे याने पाच दिवसाचा कोर्स पूर्ण करीत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा विशेष पुरस्कार प्राप्त केला. तसेच अक्षित यादव, जीत जोगी, एलीजा बोरकुटे, सुबोध तुळकाणे व वैष्णवी चौरसिया यांनी मलेशियाच्या विद्यापीठात अभ्यासक्रम पूर्ण करीत यश संपादन केले आहे. सर्वोत्कृष्ट सादरीकरण व सर्वोत्तम व्यवहार्य मॉडेल निर्मितीचे पुरस्कार जिंकले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना कार्यशाळा, केस स्टडी व सांस्कृतिक देवाणघेवाण याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. हा अनुभव जागतिक व्यावसायिक क्षेत्रासाठी  आवश्यक ती कौशल्ये आत्मसात व विकसित करण्यास पुरेसा ठरल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ संचालित स्कुल ऑफ आलाईड सायन्सेस हे आरोग्य व्यवस्थापनाचे देशातील महत्वाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांचे उज्वल शैक्षणिक भवितव्य घडविण्यास हे केंद्र सदैव तत्पर असते, अशी भावना शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पंकज कुमार अनावडे व संचालक डॉ. क्षीतिज राज यांनी व्यक्त केली आहे. तर यशस्वी विद्यार्थी आर्यन काळे म्हणतो,  मेघे विद्यापीठाने ही संधी उपलब्ध करून देत जागतिक पातळीवार झेप घेण्याचे बळ मिळवून दिले आहे.

या विद्यापीठात गौरव प्राप्त झाल्याचे तो म्हणतो. विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, प्र – कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, संचालक सागर मेघे, डॉ. राजीव बोरले, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आरोग्य क्षेत्रात कुशल, सेवाभावी, व तरबेज मनुष्यबळ  उपलब्ध करून देण्याचे ध्येय विद्यापीठाने ठेवले आहे. त्यादृष्टीने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेत विशेष नैपून्य मिळवून दिल्या जात असल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader