अनेक समित्या मूळ उद्देशापासून भरकटल्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यालगतच्या गावकऱ्यांना निसर्ग पर्यटनातून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून निसर्ग पर्यटन विकास समिती राज्यात तयार करण्यात आल्या. मात्र, यातील अनेक समित्या मुळ उद्देशापासून भरकटल्या आहेत. नवेगाव-नागझिऱ्यातील उमरझरी निसर्ग पर्यटन विकास समितीच्या आर्थिक घोटाळ्याने या समित्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्रसंरक्षित क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाबाबत २०१२च्या अखेरीस सुधारित धोरण जाहीर केले. राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन धोरणानुसार या पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात आला आणि त्यासाठी निसर्ग पर्यटन विकास समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीचे अध्यक्षपद गावकऱ्यांकडे आणि समितीचे सदस्य म्हणूनही गावकऱ्यांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे सचिवपद मात्र वनरक्षकाकडे देण्यात आले. निसर्ग पर्यटनासाठी समितीकडे जमा होणाऱ्या पैशासाठी संयुक्त खातेही उघडण्यात आले. आदिवासी विभाग, पर्यटन विभाग, जिल्हाधिकारी, वनखाते यांच्याकडून समितीला पैसे देण्यात येतात. मात्र, समितीच्या खात्यात जमा झालेले पैसे निसर्ग पर्यटनावर खर्च होतात की आणखी कशावर, हे कळण्यासाठी मार्ग नाही. अध्यक्षांच्या सहीशिवाय संयुक्त खात्यातील पैसे काढता येत नाहीत. असे असले तरीही गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन वनकर्मचारी पैशाचा घोळ करत असल्याचे उमरझरीच्या समितीमुळे उघडकीस आले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सुमारे ३० निसर्ग पर्यटन विकास समित्या आहेत. पिटेझरी ही सर्वात मोठी, तर उमरझरी ही करोडपती निसर्ग विकास समिती मानली जाते. पिटेझरीच्या समितीची यापूर्वीही चौकशी झालेली आहे आणि उमरझरीचा एक-दोन नव्हे, तर तब्बल सुमारे ९ लाख रुपयांचा घोटाळा गावकऱ्यांनीच समोर आणला आहे. गावकऱ्यांच्या बळावर वनकर्मचारी पैसे कमावत असतील तर काय होऊ शकते, हे गावकऱ्यांनी समितीचे सचिव असलेल्या वनरक्षकाला कोंडून दाखवून दिले. हे पैसे त्वरित भरले नाहीत तर यापेक्षाही वाईट परिणाम भोगण्यास तयार रहा, अशी धमकीसुद्धा गावकऱ्यांनी दिलेली आहे. उमरझरीचा अलीकडेच घडलेला हा प्रकार राज्यातील इतरही समित्यांना इशारा देणारा आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यातून संरक्षण आणि संवर्धनसाठी समिती स्थापन झाल्या आहेत, पण एका समितीच्या बळावर इतर समित्या निभावून नेत असल्याचे अनेकदा घडून येते. त्यामुळे यापुढे असा प्रकार होणे म्हणजे वनखात्यासाठी धोक्याची
घंटा आहे.