लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे संमेलन होत आहे मात्र आजपर्यंत झालेल्या ९९ व्या संमेलनातून नाट्य परिषदेने काय साधले. संमेलनांचा नाट्य व्यवसायाला काही फायदा झाला का असे प्रश्न उपस्थित करत ही संमेलने म्हणजे सरकारच्या पैशावर करण्यात आलेले केवळ गेट टू गेदर असल्याचे परखड मत ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य परिषदेचे माजी पदाधिकारी शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
अभिनेते शरद पोक्षे नाथुराम गोडसे नाटकाच्या निमित्ताने नागपुरात आले असते ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. खरे तर जगातील एकमेव संस्था असेल की ज्याची सलग शंभर संमेलन झाली आहे आणि ही मराठी नाटकाला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. पण या संमेलनातून नाट्य व्यवसायाला मात्र इतक्या वर्षात काहीच उपयोग झालेला नाही. संमेलनावर सरकारकडून निधी दिला जातो मात्र नाट्य व्यवसायाला काही उपयोग होत नाही. आजही जळगाव नाट्यगृहाचे ७५ हजार रुपये भाडे नाट्य निर्मात्याला भरावे लागते. अनेक नाट्यगृह अस्वच्छ असून त्याची अवस्था वाईट आहे. कुठे नळ नाही तर कुठे पंखा नाही, ध्वनी व्यवस्था चांगली नाही त्यामुळे बाहेरुन ती मागवावी लागतात. अशी नाट्यगृहाची स्थिती आहे. आज मुंबई सोडून अन्य शहरात निर्मात्याला नाटक करणे परवडत नाही. ५०० रुपयापेक्षा वरची तिकिट ठेवायची इच्छा होते मात्र महागाची तिकिटे कोणी घेत नाही. साडेचार लाख बुकींग झाले असले तरी खर्च इतका असतो की त्यातून निर्मात्याला मात्र काही मिळत नाही. याचा विचार परिषदेने केला पाहिजे.
आणखी वाचा-धक्कादायक! सतत पैसे मागणाऱ्या पत्नीच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या
आजपर्यंतच्या संमेलनात असे का घडले आहे की त्याचा उपयोग नाट्य व्यवस्थेला झाला आहे. जाहिरातीचे रेट कमी झाले नाही. सभागृहाचे भाडे वारेमाप वाढले आहे. ९९ संमेलन झाली मात्र आम्ही काळानुरुप बदलायला पाहिजे ते बदलत नाही. आज सिनेमासाठी चित्रपट गृह बदलले. सिंगल स्क्रीनची मल्टीप्लेक्स पॉश थिएटर झाली आहे. नाट्यगृहाच्या बाबतीत असे का होत नाही. थ्री स्टेज मल्टीप्लेक्स नाट्यगृह आपण का निर्माण करु शकलो नाही.
सरकारकडून संमेलनासाठी पैसा घेतो त्यामुळे नाट्य संमेलनाला राजकीय लोकांची गर्दी जास्त असते. त्यामुळे व्यासपीठावर पहिल्या रांगेत सर्व राजकीय नेते आणि मागे नाट्य परिषदेचे पदाधिकारी बसलेले असतात. त्यामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे संमेलन वाटतात. ज्यावेळी नाट्य परिषदेचा प्रमुख कार्यवाह म्हणून काम बघितले त्यावेळी या सर्व सूचना केल्या होत्या मात्र त्यावेळी परिषदेमध्ये वादंग झाले होते. मी परिषदेतून बाहेर पडलो आणि आता पुन्हा त्यात सहभागी व्हायचे नाही अस ठरवले आहे.
आणखी वाचा-सुनील केदार यांची प्रकृती बिघडली, रात्री उशिरा मेडिकल रुग्णालयात दाखल
शंभरावे नाट्य संमेलनाचा प्रारंभ जानेवारीमध्ये केला जात असताना राज्यातील विविध शहरात ती घेतली जात आहे मात्र या संमेलनाला मला परिषदेने सन्मानानी आमंत्रित केले तरच मी जाईल. मी कुठेही आगांतुक सारखा जात नसल्याचे शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केले.