गोंदिया: जिल्ह्यातील एकमात्र नावाजलेला पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान चे देखरेख ची जवाबदारी पार पाडणारी संस्था नवेगावबांध फाउंडेशन च्या वतीने आज शनिवार ला गोंदिया – भंडारा चे खासदार सुनील मेंढे ला काळे झेंडे दाखविण्यात आले. त्यांच्या मालकीच्या बांधकाम कंपनी ने नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात केलेल्या गार्डनच्या कामाचे लोकार्पण न केल्याचा निषेध म्हणून नवेगाव बांध फाउंडेशन च्या वतीने आझाद चौक नवेगावबांध येथे काळे झेंडे दाखविण्यात आले.

या संदर्भात माहिती देत नवेगावबांध फाउंडेशन चे अध्यक्ष रामदास बोरकर यांनी सांगितले की नवेगाव बांध पर्यटन संकुल स्थळी सन २००३-०४ या आर्थिक वर्षात गार्डन व कॉन्फरन्स हॉल करिता कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील सनी कन्स्ट्रक्शन ज्याचे मालक विद्यमान खासदार सुनील मेंढे हे आहेत असोसिएट अश्फाक अहमद यांच्या मदतीने सदर काम करायचे होते. २००८-०९ या कालीवतीमध्ये या कामाचं काम करण्यात आलं सदर काम करतेवेळी त्या कामात बऱ्याच तफावती आढदून आल्या होत्या. नवेगावबांध संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या कामाचं लोकार्पण करा अन्यथा दोषींवर कारवाई करा एवढीच मागणी होती, आणि या मागणीला धरून नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचा अध्यक्ष या नात्याने लोकायुक्ता कडे दाद मागितले. यामध्ये लोकायुक्ताने गोदिया जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना दोषी ठरविले.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार

हेही वाचा >>>एकशे दोन वर्षे जुन्या रुग्णालयाची वास्तू ठरतेय धोकादायक; डॉक्टर, कर्मचारी जीव मुठीत घेऊन देत आहेत सेवा

त्यावेळी आपण सदर कामाचे लोकार्पण करा किंवा दोषींवर कारवाई करा एवढी मागणी लावून धरली आणी खासदार सुनील मेंढे यांची भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली व त्यांना त्या गार्डनची डागडूजी करून त्याचे लोकार्पण करण्याची विनवणी केली परंतु वर्षा मागून वर्ष लोटून ही नवेगाव बांध येथील त्या गार्डनचे व कॉन्फरन्स हॉल चे लोकार्पण न झाल्याने या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध या ठिकाणी आज शनिवार ला आझाद चौक नवेगाव बांध येथे खासदार सुनील मेंढे हे जलजीवन मिशनच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आले असता आझाद चौक नवेगाव बांध या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आले.