लोकसत्‍ता टीम

अमरावती : मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ती आहे. माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. भाजपमध्‍ये जाण्‍याचा निर्णय मी स्‍वत: माझ्या मर्जीने घेतला आहे. आमदार रवी राणा यांची स्‍वत:चा युवा स्‍वाभिमान पक्ष आहे. ते भाजपमध्ये येतील की नाही, हे आम्‍ही ठरवू. खरे तर नवरा-बायकोच्‍या मध्ये कुणी न बोललेले बरे, असा टोला भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्रत्यक्षरित्या लगावला आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

काही दिवसांपूर्वी भाजपच्‍या कार्यकर्ता मेळाव्‍यात प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “नवनीत राणा या त्‍यांच्‍या घरी आदेश देतील आणि रवी राणा हे नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात काम करण्‍यासाठी भाजपमध्‍ये येतील”, असे वक्‍तव्‍य केले होते. अमरावती रेल्‍वे स्‍थानक परिसरातील प्रचार कार्यालयात गुढी उभारल्‍यानंतर पत्रकारांनी बावनकुळे यांच्‍या वक्‍तव्‍यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्‍यावर टोला लगावताना नवनीत राणा यांनी नवरा-बायकोमध्‍ये भांडण लावू नका, अशी विनंती केली.

आणखी वाचा-शरद पवार वर्धेच्या लोकसभा लढतीत एवढे स्वारस्य का दाखवताहेत? जाणून घ्या यामागील कारण…

भाजप प्रवेशाविषयी रवी राणा काय म्हणाले?

खासदार नवनीत राणांचे पती रवी राणा यांनीदेखील भाजपमधील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. रवी राणा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश विकासाचा मोठा टप्पा गाठत आहे. मोदींच्या माध्यमातून देशाची सेवा होत आहे. काँग्रेससह अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये केवळ देशसेवेच्या हेतूने जात आहेत. मी भाजपमध्ये जाणार नाही. माझा युवा स्वाभिमान पक्ष मी सोडणार नाही. मात्र माझ्या पक्षाचा भाजपला देशहितासाठी सदैव पाठिंबा असल्याचे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

नवीन वर्षात कोणावरही टीका-टिप्पणी करू नये

नव्या वर्षात आता काही दिवसातच अनेक पक्षातील मंडळी भाजपमध्ये दिसतील, असे रवी राणा म्हणाले. नवीन वर्षात कोणावरही कोणी टीका-टिप्पणी करू नये. प्रत्येकाने प्रत्येकाबाबत चांगले विचार बाळगावे, असा सल्लादेखील आमदार राणा यांनी विरोधकांना दिला. आता नवीन वर्षात प्रत्येकाने सकारात्मक विचार ठेवायला हवेत. विकासावर प्रत्येकाने भर द्यायला हवा. खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली आहेत. नवनीत राणांचा निवडणुकीतील विजय हा निश्चित आहे. आज आम्ही आमच्या प्रचार कार्यालयावर विकासाची गुढी उभारली आहे, आमदार रवी राणा यांनी सांगितले.

Story img Loader