अमरावती : हनुमान जयंतीच्या पर्वावर स्वत:च्या वाढदिवशी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमानाची १११ फूट उंचीची मूर्ती उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहरातील छत्री तलावाच्या पुढे १० एकर जागेवर ही मूर्ती उभारण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली.
या विशाल मूर्तीच्या उभारणीचे काम दिल्ली येथील एका वास्तुकला कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. या कंपनीकडे अशा प्रकारच्या मूर्ती तयार करण्याचा चांगला अनुभव आहे. १० एकर जागेत मूर्तीच्या परिसरातच राम मंदिराची स्थापना केली जाणार आहे. या ठिकाणी बगिचा, वाहनतळ, फूड मॉल अशा सुविधा राहणार आहेत. ८० बाय ८० फुटाच्या चौथऱ्यावर ही विशाल मूर्ती उभारली जाईल. या परिसरात सौंदर्यीकरण केले जाणार आहे. १ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था असलेला मंच तयार केला जाणार आहे. या ठिकाणी दिवसातून पाच वेळा हनुमान चालिसाचे पठण केले जाणार आहे, असे रवी राणा यांनी सांगितले.
मूर्तीच्या उभारणीची सज्जता झाली असून, लवकरच भूमिपूजनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह देशभरातील संत, महात्मे उपस्थित राहणार आहेत. हे एक तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. हनुमान जयंतीच्या पर्वावर मूर्तीचा संकल्पित नमुना दिल्ली येथील कंपनीने पाठवला. सामूहिक हनुमान चालिसा पठणाच्या स्थळी ही छोटी मूर्ती ठेवण्यात आली होती.
गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा आग्रह राणा दाम्पत्याने धरला होता. त्यांच्या अटकनाट्यानंतर ते देशभर चर्चेत आले. त्यानंतर राणा दाम्पत्याने अनेक ठिकाणी हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. आता राणा दाम्पत्याने हनुमानाची मूर्ती उभारण्याचा संकल्प केला आहे.