लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या ४ जून रोजी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या बाजूने दोन मतदानोत्तर चाचण्यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांची आघाडी एका मतदानोत्तर चाचणीत कौल दर्शविण्यात आला असला, तरी अमरावतीतील सर्वच प्रमुख उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत.
मतदानोत्तर चाचण्या किंवा प्रसार माध्यमांमधून कितीही दावे केले जात असले, तरी अमरावती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा दावा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी केला आहे. ते म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वांची साथ मिळाली. सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीसोबत होती. आमचा विजय निश्चितपणे होईल. मतदारांनी महाविकास आघाडीला उत्स्फूर्त मतदान केले. आमचा विजय होईल, हा आत्मविश्वास आहे, तो जनतेनेच व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-नागपूर जिल्ह्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला
अमरावती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा या २ लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा म्हणाले, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये देशाचा केलेला विकास, त्यांची लोकप्रियता यांचा निश्चितपणे फायदा मिळाला. गेल्या पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या साहाय्याने विकास कामे खेचून आणली. देशात मोदींशिवाय पर्याय नाही, हीच जनभावना आहे. अमरावतीत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आम्हाला छुपा पाठिंबा दिला. अमरावतीत नवनीत राणा यांच्याशिवाय पर्याय नाही, हे निकालातून प्रतिबिंबित झालेले दिसेल.
प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी देखील विजयाचा दावा केला आहे. आमच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोक आमच्या बाजूने होते. आमची पाटी कोरी होती. लोकांनी आम्हालाच पसंती दिली. पण, निकालात उद्या सर्वकाही स्पष्ट होणार आहे. पण, ज्या पद्धतीने भाजपच्या उमेदवाराकडून आक्रमकपणे विजयाचे दावे, जल्लोष केला जात आहे, हे धोकादायक आहे, असे दिनेश बुब म्हणाले. आमच्याकडे जनशक्ती होती. ही निवडणूक जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशीच होती, असा दावा त्यांनी केला.
अमरावती लोकसभा निवडणूक ही गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत राहिली. विद्यमान खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली तर महाविकासआघाडी तर्फे काँग्रेसचे दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रहार कडून ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक दिनेश बुब यांना मैदानात उतरवत तिरंगी लढत केली.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा या २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आले होते.