अमरावती : मतदानयंत्राद्वारे मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने मोहीम उघडलेली असताना भाजप आणि काँग्रेसमध्‍ये त्‍यावरून वाक्युद्ध सुरू झाले आहे.

अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्‍यासोबतच बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील. मग, ही निवडणूक मतपत्रिकेच्‍या माध्‍यमातून घ्‍यावी, असे आव्‍हान भाजपच्‍या नेत्‍या माजी खासदार नवनीत राणा यांनी काल दिले होते. बळवंत वानखडे यांनी त्‍यावर प्रतिआव्‍हान दिले आहे. बळवंत वानखडे म्‍हणाले, नवनीत राणा यांनी मला आव्‍हान दिले आहे. मी ते आव्‍हान स्‍वीकारतो. मी कुठल्‍याही क्षणी राजीनामा देण्‍यास तयार आहे, पण लोकसभेची पोटनिवडणूक मतपत्रिकेवर घेण्‍यात येईल, असे निवडणूक आयोगाचे पत्र आपल्‍याला दाखवावे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित

लोकसभा निवडणुकीच्‍या काळात नवनीत राणा आणि बळवंत वानखडे यांच्‍यात शाब्दिक युद्ध रंगले होते. या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्‍यानंतर काही दिवस नवनीत राणा यांनी राजकीय मंचावर येण्‍याचे टाळले होते. पण विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान त्‍यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती.

विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी मतदानयंत्राद्वारे गैरप्रकार करण्‍यात आल्‍याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. त्‍यावर भाष्‍य करताना नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांची खिल्‍ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर सर्वकाही बरोबर होते. त्‍यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता विरोधात निकाल आला, म्‍हणून लोकशाही धोक्‍यात आली, हा विरोधकांचा दुटप्‍पीपणा आहे, असे नवनीत राणा म्‍हणाल्‍या होत्‍या.

हेही वाचा – लोकसत्ता लोकांकिका : सर्जनशील अभिनयाने गाजली प्राथमिक फेरी, अंतिम फेरी १२ डिसेंबरला

त्‍यावर भाष्‍य करताना नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांची खिल्‍ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर सर्वकाही बरोबर होते. त्‍यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता विरोधात निकाल आला, म्‍हणून लोकशाही धोक्‍यात आली, हा विरोधकांचा दुटप्‍पीपणा आहे, असे नवनीत राणा म्‍हणाल्‍या होत्‍या.

खासदार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचे आव्‍हान स्‍वीकारताना अट देखील घातली आहे. आपण खासदारकीचा राजीनामा आज-उद्या, केव्‍हाही देण्‍यास तयार आहोत, केवळ मतपत्रिकेवर निवडणूक घेण्‍याविषयीचे निवडणूक आयोगाचे लेखी पत्र त्‍यांनी आपल्‍याला दाखवावे, असे बळवंत वानखडे यांचे म्‍हणणे आहे. मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्‍याच्‍या मागणीवरून सुरू झालेला हा वाद पेटण्‍याची चिन्‍हे आहेत.

Story img Loader