अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादावर राणा यांची पत्नी व अमरातीच्या खासदार नवनीत राणा यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे.राणा यांनी कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे कडू आक्रमक झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. . त्यानंतर दोघेही शांत झाले असे वाटत असताना पुन्हा एकमेकांना आव्हान देत आहे. या संपूर्ण वादावर गुरूवारी खासदार नवनीत राणा यांना नागपूर विमानतळावर विचारणा केली असता, एरवी प्रत्येक विषयावर बोलणाऱ्या राणा यांना मौन बाळगणे पसंत केले.
हेही वाचा >>>अमरावती: ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तिवसा येथे काँग्रेसचे ‘रास्ता रोको’
रवी राणा आणि बच्चू कडू हे दोघेही माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळते. असे सांगत रवी राणा-बच्चू कडू वादावर बोलणे त्यांनी टाळले. मी माझ्या कामावर लक्ष देते. कारण माझी कामे माझ्यासाठी अधिक महत्वाची आहेत.मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात आहात का, असे विचारले असता, मुंबई माझे घर आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ते जे सांगतात, ते आम्ही करतो, असे खासदार राणा म्हणाल्या. रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. पण त्या वादाशी माझा संबंध नाही. मी घरी रवीजींची पत्नी आहे, अन् बाहेर लोकसेवक आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले.