अमरावती : गेल्या काही दिवसांत ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रात येऊन प्रक्षोभक भाषणे केली आहेत, पण ओवेसींनी हे लक्षात घेतले पाहिजे, की आता उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही. ओवेसींनी मर्यादेत राहून बोलावे, मर्यादा ओलांडू नये, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओवेसी यांनी रविवारी रात्री येथील एका जाहीर सभेत नवनीत राणा यांच्‍यावर टीका केली होती. भाजपला पराभूत करण्‍यासाठी येथील मुस्लिमांनी नवनीत राणांना मतदान केले, पण दिल्‍लीत गेल्‍याबरोबर नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊन त्‍यांनी आपला खरा चेहरा उघड केला, असे वक्‍तव्‍य ओवेसी यांनी केले होते. त्‍यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्‍हणाल्‍या, “हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्‍ट्र आहे, या ठिकाणी औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत, ते खपवून घेतले जाणार नाही. ओवेसी प्रक्षोभक भाषणे करतात, त्‍यांच्‍या सभेत औरंगजेबाच्‍या समर्थनार्थ घोषणा लागतात, हे काय चालले आहे. आता उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही”.