लोकसत्‍ता टीम

अमरावती : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी हिंदुत्व हा एक आजार आहे, असे वक्‍तव्‍य नुकतेच केले. या वक्‍तव्‍यामुळे इल्तिजा मुफ्ती चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही होते आहे. आता भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी इल्‍तिजा मुफ्ती यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करतानाच आणखी एक वादग्रस्‍त केले आहे. ज्‍यांना जय श्रीरामच्‍या नाऱ्याचा त्रास होतो, ज्‍यांना हिंदुत्‍वाविषयी द्वेष आहे, त्‍यांना सरकारने पाकिस्‍तानात पाठवून द्यावे, असे नवनीत राणा यांनी म्‍हटले आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी हिंदुत्व हा एक आजार आहे, हिंदुत्‍व आणि हिदूइझम मध्‍ये खूप अंतर आहे, असे वक्‍तव्‍य केले आहे. आता हिदुस्‍तानात राहणाऱ्या सर्व हिंदूंना आता हिंदूइझम काय आहे, हे मेहबुबा मुफ्ती यांच्‍या मुलीकडून शिकावे लागणार आहे. मी केंद्र सरकारला देशातील सर्व हिंदू लोकांच्‍या वतीने हात जोडून विनंती करते की, ज्‍यांना जन्‍म या हिदुस्‍थानच्‍या भूमीवर झाला आहे.

आणखी वाचा-अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

त्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विषयी द्वेष वाटत असेल, हिंदू आणि हिंदूइझमपासून त्रास होत असेल, जय श्रीराम या नाऱ्याचा त्रास असेल, तर या सर्व लोकांना पाक‍िस्‍तानात पाठवावे. कारण हा हिंदुस्‍तान आहे, या ठिकाणी जय श्रीरामचे नारे देखील लागतील, हिंदू आपले उत्‍सव देखील उत्‍साहाने साजरे करतील. ज्‍यांना हिंदुस्‍तानाविषयी द्वेष आहे, ते पाकिस्‍तानातून जाऊ शकतात.

इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्‍यात त्या म्हणतात, “हे सगळे पाहून प्रभू रामही मान झुकवतील. प्रभू रामही हेच म्हणतील की माझे नाव घेऊ नका. या अल्पवयीन मुस्लिम मुलांना फक्त यासाठी मारले जाते आहे की त्यांनी रामाचे नाव घेतले नाही. हिंदुत्व हा एक आजार आहे. या आजाराने लाखो भारतीयांना ग्रासले आहे.”

आणखी वाचा-पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…

नवनीत राणा यांना लोकसभा निवडणूक काळात भाजपने त्यांना गुजरातमध्ये स्टार प्रचारकही बनवले होते. ५ मे रोजी गुजरातमध्ये प्रचार करताना नवनीत म्हणाल्या की, ज्याला जय श्रीराम म्हणायचे नाही, ते पाकिस्तानात जाऊ शकतात. हा हिंदुस्थान आहे. भारतात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हणावे लागेल. यावरून त्‍यांच्‍यावर टीका झाली होती.

Story img Loader