लोकसत्‍ता टीम

अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघातून सर्वच प्रमुख उमेदवारांनी विजयाचे दावे केले असले, तरी कायम चर्चेत असलेल्‍या या मतदार संघात भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या अभिनंदनाच्‍या फलकांनी लक्ष वेधून घेतले आहे.

Badlapur candidature, fight in BJP, Badlapur,
बदलापुरात उमेदवारीवरून भाजपातच राडा, निरीक्षकांसमोरच यादीवरून कथोरे – पाटील गटात वाद
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
In Uran tensions rise between Shiv Sena Thackeray and Shetkari Kamgar Party ahead of assembly elections
उमेदवारीसाठी शेकाप-ठाकरे गटात चुरस; उरण विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू, काँग्रेसचाही दावा
Kalyan-Dombivli, Shrikanth Shinde, Shivsena,
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतून विधानसभेसाठी इच्छुकांना खासदार डॉ. शिंदे यांची तंबी
Bapusaheb Pathare, Sharad Pawar group,
अखेर भाजपा नेते बापूसाहेब पठारे यांचा शरद पवार गटात प्रवेश
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad offers 11 lakhs to anyone cutting of Rahul Gandhis tongue
बुलढाणा : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस; संजय गायकवाड यांची प्रक्षोभक घोषणा
Prataprao Bhosale grandson Yash Raj Bhosale met Sharad Pawar satara news
प्रतापराव भोसलेंचे नातू शरद पवारांच्या भेटीला; वाईतून उमेदवारीची मागणी
Jayashree Kurane of Tararani Party is nominated in Hatkanangale
हातकणंगलेत ताराराणी पक्षाच्या जयश्री कुरणे यांची उमेदवारी

अमरावती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे शब्‍द या फलकावर मुद्रित असून ते अमरावतीच्या राजकमल चौकात झळकले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे खाजगी सचिव अवि काळे यांच्या मार्फत हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर नवनीत राणा यांचा उल्लेख हिंदू शेरणी म्हणून करण्यात आला आहे. त्यावर आमदार रवी राणा, नवनीत राणा, खाजगी सचिव अवि काळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची छायाचित्रे देखील दिसून येत आहेत.

आणखी वाचा-पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार….. सुनील मेंढेंचा दावा

या फलकावरून राणा समर्थकांचा आत्‍मविश्‍वास प्रकट होत असला, तरी विरोधकांनी त्‍यावर आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे. काँग्रेसनेही या मतदार संघातून विजयाचा दावा केला आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुती बाजी मारेल अशा स्वरुपाचे जे काही कल दाखवले जात आहेत, खरेतर माध्यमातील काही मंडळींकडून घाबरुन दिल्या जात आहे, असे आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. निकालापुर्वी जो काही कल समोर आला आहे, तो ‘मॅनेज’ असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

आणखी वाचा-बुलढाणा : प्रतापराव जाधव म्हणतात, ‘गड कायम’; खेडेकर म्हणतात, ‘परिवर्तन निश्चित’ तर तुपकरांचा ‘एक्झिट पोल’वर भरोसा नाही

निकालाआधी आमदार रवी राणा यांचे विधान चर्चेत आले आहे. उद्धव ठाकरे हे येत्‍या पंधरा-वीस दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सामील होतील, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडली आहे, त्‍यातून उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये सामील होतील. देशातील सर्व विरोधक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करतील, कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे, असे आमदार रवी राणा यांनी म्‍हटले आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी नवनीत राणा यांना छुपा पाठिंबा दिला होता, असाही दावा रवी राणा यांनी केला आहे. यशोमती ठाकूर या निकाल विरोधात गेल्‍यास दंगल घडविण्‍याची भाषा बोलत आहे. पोलिसांनी त्‍यांची चौकशी केली पाहिजे, असेही रवी राणा यांनी म्‍हटले आहे.