नागपूर : आजपासून “नवतपा”ची सुरुवात झाली आहे. तापमान पुन्हा एकदा ४३ अंश सेल्सिअसवर गेले असताना पावसाचे ढगदेखील आहेत. त्यामुळे यावर्षी “नवतपा”चा ताप फारसा वाढणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्याची अखेर म्हणजे “नवतपा”चा ताप. या काळात तापमानाची सर्वोच्च नोंद होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजवर हीच स्थिती राहिली आहे. गेल्या दोन-चार वर्षांत हवामानाचे चक्र पालटले आहे. यावर्षी हवामानात खूप जास्त बदल झाले. ज्या महिन्यात तापमानाचा पारा चढलेला असतो, त्याचवेळी सर्वत्र गारपीटीसह पाऊस झाला. आताही तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले असताना पावसाचे ढग डोकावू लागले आहेत.

हेही वाचा – वर्धा : अचानक गडकरींमधला ‘आरटीओ’ जागा झाला अन…

यंदा २२ मेपासून सुरू होत असलेल्या नवतपादरम्यान विदर्भ व नागपुरातील तापमानात फारशी वाढ होणार नसल्याचे संकेत आहेत. प्रादेशिक हवामान खात्यानुसार, या काळात तापमान ४२ ते ४३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ महिन्यात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी सूर्य १५ दिवसांसाठी रोहिणी नक्षत्रात असतो. यातील सुरुवातीचे नऊ दिवस सर्वाधिक तापमानाचे असतात, अशी धारणा आहे. त्यामुळे या नऊ दिवसांना नवतपा म्हणून संबोधले जाते. या काळात सूर्याची किरणे पृथ्वीवर सरळ रेषेत येतात. यामुळे तापमान व उकाड्यात वाढ होते.