नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसल्याने सत्ताधारी पक्षातील भाजपा आणि शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी नवाब मालिकबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आजही नवाब मलिक अजित पवार गटाकडे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली असून महायुतीमध्ये सारे आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – अमरावती : कारचा पाठलाग; युवतीवर गोळीबार करून हल्‍लेखोर पसार

या विषयावर अजित पवार यांनी आज आपली भूमिका विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मांडली. अजित पवार म्हणाले, नवाब मलिक आजारी पडल्यावर प्रथमच राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात आले आहे. त्यांना कोणासोबत राहायचं, हे त्यांनाच स्पष्ट करावे लागेल. सभागृहामध्ये कुठे बसावे हा निर्णय अध्यक्षांना घ्यायचा असतो, ते नवाब मलिक कुठे बसतील हे ठरवतील.

हेही वाचा – ‘उमेद’च्या चिमुकल्यांना उच्च शिक्षण आणि बारामतीची सैर! आमदार रोहित पवार उचलणार भार

दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मदत घेऊन जमीन बळकविल्याप्रकरणी ‘ईडी’ने मलिक यांना अटक केली होती. भाजपाने मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले आहेत. अजित पवार महायुतीत येताच काही दिवसांनी मलिक यांना जामीन मिळाला. त्यानंतर प्रथमच ते विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik again at the ncp office in vidhan bhawan area what did ajit pawar say mnb 82 ssb
Show comments