गडचिरोली : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. शंकर वंगा कुडयामी (३४), असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून, तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कांडलापार्ती येथील रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिरोंचा येथील पोलीस आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला सिरोंचा-कालेश्वरम मार्गावर लावलेल्या नाकेबंदीदरम्यान अटक केली. शंकर हा कट्टर नक्षल समर्थक होता. नक्षल्यांना राशन पुरविणे, नक्षल्यांचे बॅनर लावणे, गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता. २०१५ पासून तो नॅशनल एरिया कमिटीत भरती झाला. चार चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. २०२२ मध्ये छत्तीसगडमधील मोरमेड-चिंतलपल्ली आणि २०२३ मध्ये बडा काकलेर व डम्मूर-बारेगुडा जंगलात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेलया चकमकीत तो सहभागी होता. शिवाय यंदा गडचिरोली जिल्ह्यातील लिंगमपल्ली-मोदुमडगू जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता, ज्यात चार नक्षली ठार झाले होते. २०२४ मध्ये कोरंजेड, कचलेर आणि छत्तीसगडमधील भोपालपट्टनम येथील प्रत्येकी एक अशा तीन निरपराध नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – अमरावती : तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी

हेही वाचा – चंद्रपूर : महिलेला गर्भवती करून पोलीस कर्मचारी फरार

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७९ नक्षल्यांना अटक केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal supporter arrested the prize was one and a half lakhs ssp 89 ssb