गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेवर सावरगावजवळ कुलभट्टी जंगलातील डोंगरावर नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ केल्याच्या कारवाईला २४ तासही होत नाहीत तोच छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्ती पोलीस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आणखी एका नक्षली तळाचा जवानांनी पर्दाफाश केला. ७ जून रोजी ही कारवाई केली.

छत्तीसगड सीमेलगतच्या गॅरापत्तीजवळील कसनसूर – चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर व औंधी दलमचे काही सशस्त्र नक्षलवादी हे गॅरापत्तीजवळील भिमनखोजी, नारकसा  जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणा होती. त्यानुसार पोपोलीसस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचे आदेश दिले.

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Sambhal Jama mosque
संभल येथील जामा मशिद परिसरातील विहिरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मंदिर की मशिदीला मिळणार पाणी?
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
Action taken against bullet driver who makes loud noise
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…

हेही वाचा >>> पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच बंद; १५ दिवस संचातून वीजनिर्मिती ठप्प

अपर अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ ११३ बटालिन अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबवित होते.  भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, अंदाजे तीन वाजताच्या दरम्यान नक्षलवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असताना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला. विशेष म्हणजे, कालही नक्षल्यांवर नक्षलवाद विरोधी अभियानातील जवानांनी कारवाई केली होती.

हेही वाचा >>> चंद्रपूर : भाजपचे “मेरा बूथ सबसे मजबूत” अभियान सपेशल अपयशी, पक्षाला केवळ…

घटनास्थळी जाऊन शोध अभियान राबविले असता १ सोलार प्लेट २, पँट,  ३ चप्पल जोड, ३ ताडपत्री २ प्लास्टि बेल्ट, शाल, दुपट्टे, बेडशिट, लायटर, गंज, मेडिकल कीट, पाणी कॅन, कात्री असे विविध साहित्य आढळले. ते जप्त केले असून अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांना पाहून पलायन

जवानांना पाहून नक्षल्यांनी साहित्य ठेऊन तेथून पळ काढला. विशेष अभियान पथकाची सर्व पथके गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहेत. छत्तीसगड सीमेवर नक्षलवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. जवानांना कुइलीही हानी पोहोचली नाही, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Story img Loader