गडचिरोली : घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके आणि शस्त्रसाठा हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाला यश आले आहे. ही कारवाई धानोरा उपविभागांतर्गत गॅरापत्ती पोलीस मदत केंद्र हद्दीतील टिपागड जंगलात ७ एप्रिल रोजी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – लढ्यापूर्वीच ‘वज्रमूठ’ सैल! भाजपा व काँग्रेस आमदार एकाच पंक्तीत

हेही वाचा – नागपूर : बावनकुळेंचे आवाहन झुगारून भाजपाचे मविआच्या सभेविरुद्ध आंदोलन

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टिपागड जंगल परिसरात शोधमोहीम राबवली होती. दरम्यान त्यांना स्फोटके आणि शस्त्रसाठा आढळून आला. यामध्ये १२ बोर रायफल, २ स्फोटके व शस्त्र साहित्य जप्त करण्यात आले.पोलिसांना नुकसान पोहोचविण्यासाठी तसेच घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवादी गोपनीय पद्धतीने जमिनीत शस्त्रे पुरवून ठेवतात. नक्षल सप्ताह व इतरवेळी या शस्त्रांचा वापर केला जातो. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांचे कौतुक केले.