कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद बुलढाण्यातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलढाण्यात सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर सिंदखेडराजात टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. संग्रामपुरातही सत्तारांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘राज्यात महागद्दारांचे घोटाळेबाज सरकार’; आदित्य ठाकरेंचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसने बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात कृषिमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात तुकाराम अंभोरे पाटील, नरेश शेळके, दत्तात्रय लहाने, सुमित सरदार, अनिल वर्मा, सत्तार कुरेशी, अनिल बावस्कर, सुनील सोनोने, अनुजा सावळे, गौरव देशमुख, निर्मला तायडे हे सहभागी झाले होते. दुसरीकडे, नागपूर औरंगाबाद महामार्गावर सिंदखेडराजा येथे रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. संग्रामपूर येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या प्रतीमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.

हेही वाचा- बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ, संभाजी महाराज, अहिल्यादेवींचे नाव लवकरच राष्ट्रपुरुषांच्या यादीत!

सत्तार आज घेणार जिजाऊंचे दर्शन!

दरम्यान, सत्तार यांचे मंगळवारी जिल्ह्यात आगमन होत आहे. ते राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेणार आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मज्जाव करण्याचा इशारा दिला आहे. चोवीस तासांच्या आत माफी न मागितल्यास ना. सत्तार यांना बुलढाण्यात येण्यास मज्जाव करू, असे बुलढाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे ना. सत्तार यांचा उद्याचा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp activists protest against abdul sattar in buldhana over commenting supriya sule dpj
Show comments