राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच नागपूर दौरा आटोपला. या दौ-यात पवार यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर खास गडकरी यांच्या आग्रहाखातर पवार यांनी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जागतिक दर्जाच्या संगीत कारंजी शो बघितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सूरजागडात सहा खाणींसाठी वीस कंपन्या उत्सुक; उच्च दर्जाचे लोहखनिज असल्याने अनेकांचा डोळा

या पूर्वीही गडकरी यांनी ही कारंजी अनेक मोठ्या नेत्यांना दाखवली. सर्वांनी कौतुक केले. पवार यांनी मात्र कौतुकासोबत काही सूचनाही केल्या. पवार म्हणाले, मी नागपूरला नेहमीच येतो. संगीत कारंजी बघण्याचा आनंद अविस्मरणीय आहे. गडकरी यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना जगात जे चांगले दिसेल ते नागपूरमध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना कसा होईल हे ते बघतात. नागपूरची संगीत कारंजी हा त्यातलाच एक प्रकार. मात्र मी काही सूचना करू इच्छितो. संगीत कारंजी दाखवताना भारताचा इतिहास सांगण्यात आला. पण मोगलानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचा उल्लेख यात नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगताना त्यात पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचाही त्यात समावेश करावा, अशी विनंती त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar praise bjp leader nitin gadkari in nagpur cwb 76 zws
Show comments