शहरातील ५७२ आणि १९०० ले- आऊटसमधील विविध कामे तातडीने करण्यात येऊन वर्षोनुवर्षे नागरी समस्यांना तोंड देत असलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने यांची भेट घेतली.
गेल्या पाच महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस ५७२ आणि १९०० ले-आऊटमध्ये विकासकामांसाठी पाठपुरावा करीत आहे. वर्धने यांनी, लवकरात विकास कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. ले-आऊटमध्ये जलवाहिन्या टाकण्यात येतील. रस्ते तयार करण्यात येतील. सांडपाणी आणि मलवाहिन्या टाकण्यात येतील. यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही वर्धने यांनी सांगितले.
शहरातील अनधिकृत ले-आऊटवर विकास कामे करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना नियमित करण्यात आले. परंतु त्यावर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. या ले-आऊटमधील प्रलंबित प्रश्नाकडे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष वेधले. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, महापालिका पक्ष नेता राजू नागुलवार, महापालिका माजी पक्ष नेता वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वर्धने यांची भेट घेतली आणि शहरातील ५७२ तसेच इतर १९०० ले-आऊटमधील सुमारे १५९.०२ कोटी रुपयांच्या प्रलंबित कामांकडे लक्ष वेधले. वर्धने यांनी कामाला लवकरच प्रारंभ करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक अशोक काटले, पकंज ठाकरे, सुनील राऊत, राजेंद्र बढिये, भूपेश भोयर, विशाल खांडेकर, ईश्वर बाळबुधे, जानबा मस्के, महेंद्र भांगे, मिलिंद मानापुरे, दिनकर वानखेडे, धीरज भंडारे, अरविंद जोगे, चेतन मस्के, रामदास तोटे, अमोल रामटेके, सोहेल अहमद आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा