भाजपकडून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच चित्रा वाघ विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ९ नोव्हेंबर रोजी कारंजा येथे जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभदा नायक यांनी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा >>>नागपूर: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी उद्या नितीन गडकरी यांच्या कार्यालया पुढे आंदोलन
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ह्या यांनी वाशीम येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यात महिला संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यानंतर कारंजा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शुभदा नायक यांना भाजप मध्ये घेऊन संघटन वाढीचा प्रयत्न करून राष्ट्रवादीला धक्का दिला असल्याची चर्चा होत आहे.