लोकसत्ता टीम

वर्धा : करवाढ करण्याचा वर्धा पालिका प्रशासनाचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरू लागत आहे. आता करवाढीस स्थगिती दिल्याची बाब खरी नसून वाढ रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on bulldozer action
SC on Bulldozer Action: ‘बुलडोझर कारवाई’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

वर्धा नगर परिषदेने घरकर व पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे. पुढील चार वर्षासाठी या वाढविण्यात आलेल्या करास स्थगिती दिल्याचे आमदार डॉ.पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून स्पष्ट केले होते. मात्र ही बाब खोटी असल्याचे निदर्शनास आणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांनी अद्याप असा आदेश नसल्याचे स्पष्ट केले. हा भाजपचा अपप्रचार असल्याची टिका करीत नागरिकांनी हरकती नोंदवाव्या, असे आवाहन त्यांनी केले. स्थगितीचा आदेश अद्याप नगरपरिषदेला प्राप्त झाला नाही. मात्र स्थगितीची चर्चा झाल्याने नागरिकांनी वाढीव करावर आक्षेप नोंदविले नाही. आक्षेप न घेतल्यास नागरिकांना वाढीव कर भरावाच लागणार. येत्या आठ दिवसात ही वाढ रद्द न केल्यास शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा समीर देशमुख यांनी आज धरणे आंदोलनात दिला.

आणखी वाचा-‘अन्न सुरक्षा अधिकारी’पदाबाबत शैक्षणिक अर्हतेचा गोंधळ! शासनाकडून ठोस भूमिकेची गरज

यावेळी बोलतांना ते म्हणाले की करवाढ विरोधात एक महिन्यात अपील करावे लागते. परंतु अपील समितीच नसल्याने ते कुणाकडे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही करवाढ करतांना बराच घोर झालेला आहे. पंतप्रधान घरकुल योजनेत दारिद्रयरेषेखालील गरजूंना घरे मिळतात. मात्र अश्याही लाभार्थ्यांना कर भरण्याची नोटीस देण्यात आली. काही नागरिकांची घरे नालवाडी ग्रामपंचायत हद्दीत आहे. त्यांच्यावरही वर्धा पालिकेने करवसूलीचा नोटिस ठोकला. कर आकारतांना जेवढे बांधकाम मंजूर करण्यात आले, त्याच्या क्षेत्रफळानुसार कर आकारणे अपेक्षीत आहे. मात्र बांधकाम क्षेत्रफळाच्या दुप्पट कर लावण्यात आला. ज्यांचा घर कर थकीत आहे, त्यांच्या थकबाकीवर वार्षीक चोवीस टक्के व्याजदर आकारण्यात आला आहे. पाणी पुरवठा नियमीत नाही. मात्र पाणीपट्टी करात प्रचंड वाढ करण्यात आली. पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा निघालेला नाही. मग पाणीपट्टी कशी वाढविली, असा सवाल समीर देशमुख यांनी उपस्थित केला. यावेळी माजी न.प.सभापती मुन्ना झाडे, माजी नगराध्यक्ष संतोष ठाकुर व दिपीका आडेपवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, तसेच ज्योती देशमुख, विणा दाते, शरयू वांदिले, सोनल ठाकरे, संदीप किटे, प्रशांत कुतरमारे, राहूल घोडे, खलील खतीब,प्रदीप जग्यासी,संकेत निस्ताने ,संजय काकडे,मंगेश गावंडे,सचिन ठाकरे,प्रणय कदम,अमर देशमुख,नावेद शेख व अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.