नागपूर : ’दिल्लीत मोदी महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रकाशित झाल्याने राजकीय चर्चांना उत आला आला आहे. शिंदे दिल्लीच्या आशिर्वादाशिवाय अशी जाहिरात करू शकत नाही, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या विषयावरून विरोधक देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तब्बल दोन दशकांनी ‘ती’ जिवंत सापडली; ‘नंददीप’ च्या पुढाकारातून मीरा पश्चिम बंगालमधील घरी पोहोचली

नागपूर विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आव्हाड म्हणाले, की ’ती’ जाहिरात पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटत आहे. आज फडणवीस यांना कळले असेल एकनाथ शिंदे यांची राक्षसी महत्वाकांक्षा वाईट आहे. वेशांतर करून बैठका घ्यायचे, आज फडणवीस हे नाव पुसण्याचे काम त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून केले. ते स्वतःबद्दल धर्मयोद्धा, कर्मयोद्धा असे लिहितात हे आपण पहिलेच आहे. आमचे ख्खे आयुष्य जाऊनही आम्ही स्वतःला शरद पवार यांच्या कार्यकर्ते समजतो, असेही ते म्हणाले.