बुलढाणा : येत्या ४ व ५ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘ राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबीर शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील विचारवंत व अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.सिंदखेडराजाचे आमदार तथा माजीमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज दुपारी स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आ. शिंगणे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या शिबिरात २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकासाठी कार्यकर्त्यांची मनोभूमिका बळकट करण्यात येणार आहे. तसेच हुकूमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील वर्तमान स्थितीचे कार्यकर्त्यांना आकलन व्हावे, भावी राजकीय व अन्य आव्हानांसाठी त्यांना सज्ज करणे हा मंथन शिबिराचा उद्देश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशातील वर्तमानस्थिती बिकट असून भविष्य अनिश्चित आहे. शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून दडपशाहीद्वारे विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. महागाई, बेरोजगारी, रुपया अवमूल्यन, ढासळती अर्थव्यवस्था याने कळस गाठला आहे. अवाजवी धार्मिक मुद्दे उपस्थित करून या गंभीर मुद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे शिंगणे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : चंद्रपूर: दिवाळीत वाघोबाची आणि नागाची पूजा; गोंड गोवरी समाजाची ४५० वर्षांची परंपरा

बच्चू कडू अभिनंदनास पात्र

यावेळी शिंगणे यांनी विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. आ. बच्चू कडू यांनी आ. रवी राणा यांना दिलेल्या ‘ ५० खोके’ सिद्ध करण्याच्या आवाहनाबद्दल ते अभिनंदनास पात्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यात खोक्यांची चर्चा होत असून कडू यांनी जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याचा खुलासा करावा, वास्तव काय आहे, हे स्पष्ट करावे, असे आवाहनही शिंगणे यांनी केले. या चर्चेचा सोक्षमोक्ष करावा, जनतेसमोर वास्तव मांडावे, किमान खंडनतरी करावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविला.

आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र यात जागा वाटप हा कळीचा मुद्दा असल्याची कबुली शिंगणे यांनी दिली. नोटांवर कुणाचा फोटो या चर्चेसंदर्भात विचारणा केली असता, मुळात ही चर्चाच निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. फोटो कोणाचा या चर्चेऐवजी देशाची ढासळती अर्थव्यवस्था व डॉलरच्या तुलनेत रुपयाचं वेगाने होणारे अवमूल्यन, यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र यावर चर्चा करून उपाययोजना करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार व नेते याला बगल देत आहे, असे सांगतानाच ‘रुपया कमजोर झाला नसून डॉलर अधिक मजबूत झाला’, या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या वादग्रस्त विधानाची त्यांनी खिल्ली उडविली. अर्थमंत्री असे बोलले तर देशाचे काय भले होणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : माणुसकी : बेवारस व्यक्तीवर बौद्ध, मुस्लीम व्यक्तींनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

शिंदे-फडणवीसांच्या राजवटीतच प्रकल्प राज्याबाहेर का?

महाविकास आघाडीचे सरकार असताना जे काही व्हायचे ते मुंबई आणि महाराष्ट्रापुरते व्हायचे. त्याकाळात राज्यातील कोणताही प्रकल्प दुस-या राज्यात गेला नाही. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्याबरोबर वेदांतासारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर त्यातही गुजरातमध्येच का जात आहेत? असा प्रश्न आ. शिंगणे यांनी उपस्थित केला. यामुळे केवळ गुजरातचे भले करण्यासाठीच ही जोडगोळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाली नाही ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली.