वाशिम : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली असतानाच आता मानोऱ्याचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

राज्यात राष्ट्रवादीचे सरकार असतानादेखील निधी मिळत नसल्याने मागील काही दिवसांपासून मानोऱ्याचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे कमालीचे नाराज होते. निधी मिळत नसल्याने जनतेची कामे करता येत नसल्याची खदखद ठाकरे यांनी व्यक्त केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे पाठोपाठ राष्ट्रवादीमधून अजित पवार भाजपा शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली. आशातच मानोऱ्याचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये उद्या २७ ऑगस्ट रोजी पक्ष प्रवेश करणार आहेत.

sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Mahendra Thorve, Mahendra Thorve security guard,
रायगड : आमदार थोरवेंच्या सुरक्षा रक्षकावर मारहाणीचा आरोप.. थोरवे यांच्याकडून आरोपांचे खंडन
Mahayuti Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Dispute in Mahayuti: ‘चोराच्या उलट्या बोंबा’, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया
Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
Ajit Pawar meeting in Katol assembly constituency on 31st August
अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची ३१ला सभा, काय बोलणार?

हेही वाचा – आता टॉवरवर चढून आंदोलन करणार, वंचितच्या इशाऱ्याने प्रशासनाची तारांबळ

हेही वाचा – माझ्या घरात मी सोडून सगळेच डॉक्टर, मेडिकलचे निमंत्रण पत्नीनेच दिल्याने…

हेमेंद्र ठाकरे सध्या मानोरा नगर पंचायतचे नगराध्यक्ष असून त्यांच्यासोबत इतरही नगरसेवक जाणार असल्याची माहिती आहे. २७ ऑगस्ट रोजी माजी राज्यमंत्री कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.