नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ डिसेंबरला नागपूर येथे येत आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थीतीत दुपारी २.०० वाजता झिरोमाईल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये आमदार रोहीत पवार यांच्या ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला पाहुणे म्हणुन आमच्या मित्र पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये उध्दवजी ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग उपस्थीत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांच्या कापुस, सोयाबीन, धान, संत्रा, तुर व ईतर शेतमालास  योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरीत भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागु करा, कंत्राटी नोकरभरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शाळा दत्तक योजना रद्द करा, समुह शाळा योजना रद्द करा, या व इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. रोहीत पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली आहे.

हेही वाचा >>>अधिवेशन काळात विधी मंडळ परिसरातील फूड स्टॉलची रोज तपासणी; धर्मराव बाबा आत्राम असे का म्हणाले…

१२ डीसेंबर ला दुपारी दोन वाजता झिरोमाईल येथे होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन  शिवसेनचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, खा. संजय राउत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पुथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकापाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातील सर्व मित्र पक्षाचे खासदार, आमदार व वरीष्ठ नेत्यांना या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp national president sharad pawar will come to nagpur on december 12 to organize a meeting at zeromile rbt 74 amy
Show comments